महिंद्रा ट्रॅक्टरचे बटाटा शेती मार्गदर्शक

Jul 4, 2023 |

भात शेती ही भारतातली सर्वात प्रचलित शेती पध्दतींपैकी एक पध्दत आहे, जिच्यामध्ये लहान, पाण्याने भरलेली शेते भाताच्या लागवडीसाठी वापरली जातात. या पध्दतीच्या स्वरुपामुळे, जिथे माती सैल आणि चिखलाने युक्त किंवा पाण्याने भरलेली असते, तिथे तुम्हाला योग्य प्रकारचा ट्रॅक्टर वापरणे अतिशय आवश्यक असते.

तुमच्या भात शेतीसाठी ट्रॅक्टर निवडताना, तुम्हाला तुमच्यासाठी सुयोग्य असणा-या आणि घाम न गाळता तुमची सर्व कामे हाताळू शकणा-या ट्रॅक्टरची शाश्वती करावी लागते. त्यामुळे इथे भारतातील भात शेतीसाठी सुयोग्य ट्रॅक्टर निवडण्यावरील संक्षिप्त मार्गदर्शक देण्यात आले आहे.

सुयोग्य ट्रॅक्टर निवडणे

भात शेतीसाठी सुयोग्य ट्रॅक्टर निवडताना, तुम्हाला त्याच्या गुणविशेषांचा सखोल शोध घेण्याची आवश्यकता असते. उदा. तुम्हाला हे शोधावे लागेल की, तुमच्या ट्रॅक्टरसाठी किती हॉर्सपाव्हर आवश्यकता आहे. तुम्ही नेहमीच्या भात लावणी कामांसाठी कमी हॉर्सपाव्हर वापरु शकते, पण हाउलेजसारख्या श्रमाच्या कामांसाठी तुम्ही 30 HP पर्यंत ट्रॅक्टर निवडू शकता.

पुढे तुम्हाला 2WD आणि 4WD मध्ये निवड करावी लागते. 2WD ट्रॅक्टर सर्वसामान्य भात प्रत्यारोपण कामांसाठी आदर्श आहे. 2WD भात प्रत्यारोपणासाठी सर्वोत्कृष्ठ आहे, कारण फ्रंट व्हील ॲक्सेल ट्रॅक्टरला चिखल आणि पाणी असून देखील मातीत रुतू देत नाही, आणि ते देखभालीसाठी सोपे असतात. 4WD भात ट्रान्सप्लांटर ट्रॅक्टर अधिक विस्तारीत भात शेतीसाठी, सैल माती किंवा अवजड उपकरणांसाठी सुयोग्य असतो. जर तुम्ही महिंद्रा ट्रॅक्टर निवडत असाल तर तुम्ही इतर गुणविशेषांचा देखील आनंद घेऊ शकता. प्राथमिकपणे, महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये क्लास-लिडिंग हायड्रॉलिक्स असतात, जी तुम्हाला अवजड ॲप्लिकेशन्स हाउल करण्याची आणि अधिक प्रमाणात पाणी हाउलेज व पंपन करण्याची मुभा देतात. तुम्ही पाव्हर स्टिअरींग, निरंतर मेश ट्रान्समिशन ड्युएल-क्लच, समायोज्य सीट्स,सहज पोहोचता येणारी नियंत्रणे आणि LCD क्लस्टर्सची देखील निवड करु शकता.

महिंद्रा ट्रॅक्टर का घ्यावा

वर दिलेली सर्व आवश्यक गुणवैशिष्ठे भात शेतीसाठी अत्यंत महत्वाची असून ती महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या रेंजमध्ये समाविष्ट आहेत. महिंद्रा जिव्हो रेंजचे ट्रॅक्टर्स भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात विक्री होणारे ट्रॅक्टर्स आहेत. चला त्यांचा सविस्तरपणे शोध घेऊया:

महिंद्रा जिव्हो 305 DI 4WD हा DI इंजिनसह येणारा एकमेव 18.2 kW (24.5 HP) 4WD ट्रॅक्टर आहे. यामुळे तुम्हाला अतुलनीय कार्यक्षमतेसह अनेक ॲप्लिकेशन्सना पाव्हर देण्याची मुभा मिळते. 89 Nm कमाल टॉर्कसह आणि 18.2 kW (24.5 HP) PTO पाव्हरसह, भातशेतीसाठी हा एक आदर्श ट्रॅक्टर आहे आणि याला लहान शेतांमध्ये देखील सहजपणे चालवता येते.

महिंद्रा जिव्हो 365 DI 4WD तुलना केल्यास 26.8 kW (36 HP) एवढ्या इंजिन पाव्हर सोबत कमाल 118 Nm टॉर्क आणि 22.4 kW (30 HP) ची कमाल PTO पॉवर देतो. याची रचना विशेषत: भात शेतीसाठी करण्यात आली असून , तो अतिशय चांगले मायलेज देतो. हा एक असा अद्वितीय ट्रॅक्टर आहे ज्यामध्ये क्रांतिकारी पोझिशन-ऑटो कंट्रोल (PAC) तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे तो पुडलिंग कार्यामध्ये सर्वोत्तम आहे. म्हणजेच तुमच्या भात शेतीच्या कामांसाठी तुम्हाला सतत PC लीव्हर सतत समायोजित करावा लागत नाही. तुम्ही तुमचे काम सहजतेने पूर्ण करु शकता, ट्रॅक्टर देखील चोख प्रदर्शन देतो.

जर तुम्हाला आणखीन ॲडवान्स, हाय-टेक तंत्रज्ञान हवे असेल तर तुम्ही महिंद्रा जिव्हो 245 DI रेंजचा ट्रॅक्टर निवडू शकता. जिव्हो 245 DI श्रेणी शक्तिशाली ELS DI इंजिनसह येते, जे 4.9 kW (20 HP) - 26.84 kW (36 HP) तसेच 73 Nm - 118 Nm टॉर्क निर्माण करते. ही पाव्हर 8F+4R कॉन्फिगरेशनमध्ये निरंतर मेश गिअरबॉक्ससह व्हील्सना (2WD किंवा 4WD) स्थानांतरीत केली जाते. जिव्हो 245 ट्रॅक्टर ऑटोमेटेड ड्राफ्ट आणि डेप्थ मॅनेजमेंट हायड्रॉलिक सिस्टीमसह येतो, ज्यामुळे मातीमधल्या कामांच्या एकसमान सखोलतेची शाश्वती मिळते. हायड्रोलिक्स सिस्टममध्ये 750 kg पर्यंत उचलण्याची क्षमता आणि 3000 kg ओढण्याची ताकद देखील असते,या कारणांमुळेच महिंद्रा ट्रॅक्टर भात लावणी, नांगरणी आणि ओढण्याच्या कामांसाठी आदर्श आहेत.

अखेरीस जिव्हो ट्रॅक्टर्सनी सुकरतेच्या किंवा आरामाच्या बाबतीत सर्व मानक गाठले आहेत. समायोजित करता येणा-या सीट्स, सहज पोहोचता येणारे कंट्रोल्स, ड्युएल क्लच, पाव्हर स्टिअरींग – या ट्रॅक्टरमध्ये सुरळीत व सहज शेतकी वातावरणाची खात्री देण्यासाठी सर्वकाही आहे.

योग्य उपकरण निवडणे

ट्रॅक्टर व्यतिरिक्त, भात शेतीसाठी सुयोग्य उपकरणे देखील आवश्यक असतात. यासाठी, महिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हा जलद कव्हरेज देतो, धान्याची कमी प्रमाणामध्ये हानी करतो, इंधनाचा कमी वापर करतो तसेच उत्तम प्रदर्शन देतो. कंबाइन हार्वेस्टर माउंट केलेल्या मल्टी-क्रॉप ट्रॅक्टरची महिंद्रा ट्रॅक्टरने महिंद्रा अर्जुन नोव्होच्या ट्रॅक्टर सिरीजला पूरक रचना केली आहे आणि विकास केला आहे. यामध्ये उच्च ग्राउंड क्लीयरन्ससह 41.56 kW आणि 47.80 kW इंजिन पाव्हर मिळते, ज्यामुळे एका शेतातून दुस-या शेतात सहजपणे बांध ओलांडणे शक्य होते. याव्यतिरिक्त, त्याच्या उत्कृष्ट कटर बार व्हिजिबिलीटीमुळे कापणी करणे सोपे होते आणि अनेकप्रकारे उपयोग करता येऊ शकतो.

प्राइस पेजवर जा

महिंद्रा देत असलेल्या 35+ ट्रॅक्टर्समधून तुम्ही तुमच्यासाठी सुयोग्य असलेल्या ट्रॅक्टरची निवड करु शकता. आमच्या ट्रॅक्टर्समुळे तुम्हाला नेहमीच्या ब्रेकडाउन्सची आणि देखभालींची, लो फ्युएल इकोनॉमी, अस्थिर पाव्हर डिलिवरी किंवा अडचणीची काळजी करावी लागत नाही. आम्ही तुमच्यासाठी जे सर्वोतम आहे ते प्रस्तुत करतो.

भात शेती सुकर करा आणि तुमच्या उत्पन्नाला लक्षणीयपणे वाढवा, त्याचसोबत महिंद्राच्या भात शेतीसाठी असलेल्या ट्रॅक्टर्ससोबत कामाचा खर्च देखील कमी करा. अमच्या ट्रॅक्टर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्राइस पेजवर जा.

Connect With Us

तुम्हालाही आवडेल